महाविद्यालयातील मराठी विभाग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित आहे. शैक्षणिक उपक्रमांबरोबरच ’चौकटीबाहेरचे जग’ विद्यार्थ्यांना समजावे, उमगावे यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन विभागाच्या वतीने केल्या जाते. मराठी साहित्यातील विविध वाड्ःमय प्रवाहात आपल्या लेखनाचा ठसा उमटवणारे साहित्यिक मराठी विभागात विविध उपक्रमांच्या निमित्ताने कसे येतील यासाठी विभाग सदैव तत्पर असतो. मराठी विभागात बी.ए., एम.ए. करण्याची विद्यार्थ्यांना सोय असून पीएच.डी. चे संशोधन केंद्रही येवू घातले आहे. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागात एकाच छताखाली सर्व काही मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे हे अशा नवनवीन उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत आहेत. आता नव्याने आलेल्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना खूप काही करण्याची आणि त्यांच्या कलागुणांना आणखी चांगला वाव मिळण्याची संधी आहे. गं्रथालयातील मराठी पुस्तकांचे दालन अत्यंत समृद्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही यानिमित्ताने करत आहे.
डॉ. विजयकुमार खंदारे (मराठी विभागप्रमुख)
मराठी विभाग हा इंद्रायणी महाविद्यालयातील सर्वात जुन्या विभागांपैकी एक आहे ज्याचा उद्देश मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रसार करणे आणि त्याच्या इतिहासाचा अभ्यास करणे आहे. इंद्रायणी विद्या मंदिरच्या विभागाचा एक भाग म्हणून 1967 मध्ये स्थापना करण्यात आली. एक प्राध्यापक आणि एक संशोधन सहाय्यक या पदापासून सुरुवात करून, विभाग वाढविण्यात आला आणि आता त्यात 4 प्राध्यापक सदस्य आहेत. विभागाच्या स्थापनेपासूनच्या काळात विविध साहित्यिक आणि संशोधन उपक्रमांचे केंद्र राहिले आहे. प्राध्यापक, अतिथी व्याख्याते आणि भूतकाळातील विद्यार्थी म्हणून अनेक उल्लेखनीय विद्वान आणि समीक्षक विभागाशी संलग्न आहेत.
| Sr. No | ||||
|---|---|---|---|---|
| 1 | DR. SAMBHAJI K. MALGHE |
Principal & Professor | Ph.D., MARATHI, M.Phil, MA (SET) | |
| 2 | DR. VIJAYKUMAR R. KHANDARE |
HOD, H.O.D., & Associate Professor |
Ph.D., MARATHI, M.Phil, MA (NET) |
|
| 3 | DR. SANDEEP RATAN KAMBLE |
Assistant Professor | Ph.D. MA (NET) P. G. D. J. |
|
| 4 | Prof. SATYAJIT KHANDGE |
Assistant Professor | M.A. (SET) P. G. D. J. Ph.D. (App.) |